प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भक्ती गावडेची देदिप्यमान कामगिरी! ; जलसंपदा विभागात ‘कालवा निरीक्षक’ पदावर निवड, महेंद्रा अकॅडेमीचा अभिमान उंचावला!

✍️ रूपेश पाटील.

सावंतवाडी : आपल्या अंगी असलेल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर स्वप्नांना यशाचे पंख कसे फुटतात, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे भक्ती राजन गावडे हिचे अलीकडील यश होय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत भक्ती हिने स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जलसंपदा विभागाअंतर्गत ‘कालवा निरीक्षक’ या पदावर निवड मिळवली आहे.
या उज्ज्वल यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचा नव्हे, तर महेंद्रा अकॅडेमीच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि अपार आत्मविश्वासाची साथ असल्याचे दिसून येते.
अडचणींच्या डोंगरावर मात करत, संघर्षाला संधीमध्ये रूपांतरित करत भक्तीने दाखवून दिले की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय निश्चित असेल तर यश अटळ असते.
तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यातील वाटचालीसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

दरम्यान महेंद्रा अकॅडे मीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी इतरांनीही भक्तीचा आदर्श घेऊन यश मिळविण्यासाठी सज्ज व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत भक्तीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
भक्ती गावडे हिचे हे यश अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles