मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘उत्कर्षा’ सत्राचे यशस्वी आयोजन.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी मध्ये गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2020 रोजी इयत्ता सहावी ते नववीच्या मुलींसाठी उत्कर्षा सत्राचे आयोजन करण्यात आले. या मार्गदर्शन सत्रासाठी समुपदेशक अदिती कशेळीकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी अदिती कशेळीकर यांनी मासिक पाळी व्यवस्थापन, मासिक पाळी संदर्भात येणाऱ्या समस्या आणि उपाय, हार्मोनल बदलांचा स्त्री शरीरावर होणारा परिणाम तसेच मानसिक परिणाम, मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, मासिक पाळीबद्दलचे समाजात आढळणारे गैरसमज, मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची आवश्यक स्वच्छता तसेच सामाजिक व नैतिक मूल्यांसंदर्भात विद्यार्थीदशेत आवश्यक असणारी जाणीव यासंदर्भामध्ये सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे त्यांनी दामिनी पथक , बाल गुन्हेगारी पथक, महिला सुरक्षितता, सायबर क्राईम याविषयीची माहिती दिली त्याचप्रमाणे मुलींच्या समस्यांचे निराकरण देखील केले.

दरम्यान यावेळी अदिती कशेळीकर यांना मुख्याध्यापिका श्रीम.अनुजा साळगांवकर यांच्या हस्ते स्नेहभेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्रीम. अस्मिता परब यांनी केले तर श्रीम.प्रणिता मयेकर यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles