रोणापाल येथे उद्या महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. : डबल बारी भजनांचा सामना रंगणार!

सावंतवाडी : श्री देव माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ, रोणापाल यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या रविवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी हा कार्यक्रम श्री देवी माऊली मंदिर, रोणापाल येथे होणार आहे.
सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत भाविकांना शिवलिंगावर अभिषेक करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुपारी १ वाजता आरती व तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ८ वाजता दुबळबारी भजनांचा सामना रंगणार असून भजनप्रेमींसाठी हा विशेष आकर्षणाचा कार्यक्रम ठरणार आहे. या सामन्यात बुवा श्री. गुंडू सावंत (हनुमान प्रसादिक भजन मंडळ, वर्दे-कुडाळ) आणि बुवा श्री. प्रकाश पारकर (श्री दत्तगुरु प्रसादिक भजन मंडळ, कासारेर्डे -कणकवली) सहभागी होणार आहेत.
महाशिवरात्री उत्सवानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles