कोलगावात मायकल डिसोझा यांनी ऐतिहासिक विजयाचं स्वप्न साकारलं! ; ‘ग्रो बिग’ कंपनीकडून जंगी स्वागत झालं!

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत कोलगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल मायकल डिसोझा यांचे त्यांच्या कंपनीत उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी ‘ग्रो बिग’ कंपनीचे डायरेक्टर आणि ‘ईओएस ग्लोब’ चे क्लायंट असलेल्या डिसोझा यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करून हे नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्यांच्या या विजयामुळे कंपनीत आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयाचे औचित्य साधून आज कंपनीच्या कार्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ‘ग्रो बिग’चे पार्टनर विनायक जाधव, ‘ओएस सीड’चे डायरेक्टर सुशांत पास्ते, ‘टेक एन ऑल’चे डायरेक्टर महादेव माळकर यांच्यासह लक्ष्मीकांत हरमलकर, विनय गावडे आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कंपनीचे एचआर मनीष जाधव, आयटी एक्झिक्युटिव्ह हर्षद कदम, ईओएसचे मॅनेजर अंकित कदम, टीम लीडर विक्रम निकम, रवींद्र साळुंखे आणि ९५ हून अधिक कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles