ठाणे : कळवा येथील रायझिंग स्टार प्री प्रायमरी स्कूलच्या संचालिका, सामाजिक कार्यकर्त्या तथा उपक्रमशील शिक्षिका ममता मसूरकर यांना नुकताच आदर्श रायगड वृत्तपत्र व वृत्तवाहिनी यांच्याकडून ‘राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. वीर बाजीप्रभू देशपांडे पथ, वडवली विभाग अंबरनाथ (पूर्व) येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ममता मसूरकर यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आदर्श रायगडचे मुख्य संपादक रमेश सणस, उपसंपादक अविनाश म्हात्रे, कार्यकारी संपादक शैलेश सणस, ज्येष्ठ पत्रकार गुरूनाथ तिरपणकर आदी मान्यवरांच्या हस्ते ममता मसूरकर यांना गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ममता मसूरकर यांचा राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मान.
0
53