सावंतवाडी:: दिनांक १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावन दिनी माजी राज्य मंत्री प्रवीण भोंसले यांचा वाढदिवस असतो. दरवर्षी प्रवीण भोंसले मित्र मंडळाच्या वतीने वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व आनंदमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
मात्र यावर्षी त्यांचे परममित्र, महाराष्ट्राचे विकासपुरुष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत दुःखद निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य अजूनही शोकसागरात आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा वाढदिवस साजरा करणे उचित वाटत नसल्याने माजी मंत्री प्रवीण भोंसले यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची सर्व मित्रपरिवार व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



