मळगावात सर्जा शंभूराजेंना हृदयपूर्वक मुजरा!, साजरा होणार ‘छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास’. ; १८ फेब्रुवारी ते १८ मार्च कालावधीत शिवशंभू ग्रुपच्यावतीने आयोजन.

सावंतवाडी : मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत जिल्हा परिषद शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या पटांगणावर ‘छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास’ साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन, त्याग आणि बलिदान हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांमधून तरुणांमध्ये इतिहासाबद्दल जागृती निर्माण व्हावी व राष्ट्रहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी, हा या बलिदान मासाचा मुख्य उद्देश आहे. यानिमित्त दररोज सायंकाळी ७.०० ते ७.३० या वेळेत बलिदान मासचे कार्यक्रम नियमितपणे होणार आहेत. या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या महान बलिदानाला अभिवादन करण्यात येणार असून, देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्व शहीदांच्या स्मृतींनाही आदरांजली वाहण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रेरणामंत्र, ध्येयमंत्र, तसेच राष्ट्रनिष्ठेची भावना जागवणारे संदेश दिले जाणार आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार असून, इतिहासातील बलिदानाचे महत्त्व, स्वाभिमान, निष्ठा आणि राष्ट्रसेवा यांचे मोल पटवून देण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमात मळगाव व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवशंभू ग्रुप मळगावच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles