असनिये येथे काजू उत्पादन तंत्रज्ञानावर मार्गदर्शन शिबीर संपन्न.

सावंतवाडी : तालुक्यातील असनिये येथे काजू उत्पादन तंत्रज्ञानावरील मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न झाले. दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित या शिबिराचे आयोजन प्रादेशिक फळसंशोधन केंद्र, वेंगुर्ले व कृषी विभाग, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या शिबिरासाठी प्रादेशिक फळसंशोधन केंद्र, वेंगुर्ले येथील डॉ. वैभव शिंदे (सहयोगी संशोधन संचालक) उपस्थित होते. त्यांनी काजूच्या सुधारित लागवड पद्धती, लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. मैथिलीश सपनस, कनिष्ठ काजू पैदासकार यांनी काजूच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या विविध सुधारित जातींबाबत माहिती दिली.


श्री. के. व्ही. स्वामी (संशोधन सहयोगी) यांनी काजूमधील विविध कीड व रोग तसेच त्यांच्या प्रभावी व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री. युवराज भुईम्बर (मंडळ कृषी अधिकारी, बांदा) यांनी बायोचार विषयावर सखोल माहिती दिली तसेच पीएम किसान योजनेबाबत मार्गदर्शन केले.
श्री. मिलिंद सुरेश निकम (सहाय्यक कृषी अधिकारी, तांबोळी) यांनी ‘महाविस्तार AI’ चा वापर कसा करावा याबाबत सविस्तर माहिती देत कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली.

या कार्यक्रमासाठी डॉ. डी. जे. वाघ (कृषी सहायक) तसेच कर्मचारी सौ. परब, श्री. जंगले व श्री. परब उपस्थित होते. गावातील प्रगतशील शेतकरी तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची प्रस्तावना, स्वागत व आभार प्रदर्शन श्री. मिलिंद सुरेश निकम यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ११ वाजता झाली व दुपारच्या भोजनानंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत कार्यक्रम चालला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील प्रगतशील शेतकरी श्री. आनंद पांडुरंग सावंत, श्री. शरद भिवसेन सावंत व श्री. भरत सावंत यांनी सहकार्य केले. भोजन व्यवस्थेची जबाबदारी श्री. अभिमन्यू सावंत यांनी पार पाडली.
हा कार्यक्रम असनिये पूर्व-प्राथमिक शाळा येथे घेण्यात आला असून सभागृहाची व्यवस्था शाळेचे मुख्याध्यापक श्री. गवस सर यांनी केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles