दोडामार्ग : तालुक्यातील तेरवण पेंढरेवाडी येथे आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर पत्रा शेडचे भूमीपूजन ग्रामस्थांनी केले,. दोडामार्ग तालुक्यातील डोंगराळ भागातील हे शेवटचे गाव,. महायुतीचे सरकार आल्यावर या गावाच्या विकासाची सुरुवात आ. दीपक केसरकर यांनी केली. दोन स्मशान भुमी, सभागृह, पत्रा शेड, नवीन शाळेसाठी वर्ग खोली, तेरवण मेढे रस्तता अशी बरीच काम झाली. त्याबद्दल ग्रामस्थांनी आ. केसरकर, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांचे आभार मानले.
वतेरवण पेंढरेवाडी येथील वार्षिक सत्यनारायण पुजेच्या दिवशी लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. तेव्हा माजी मंत्रीतथा आ. दीपक केसरकर, गणेश प्रसाद गवस व इतर मान्यवर यांच्याकडून लोकार्पण सोहळा कार्यक्रम होणार आहे, अशी माहीती शिवसेना पदाधिकारी विजय खेमाजी गवस यांनी दिली. दरम्यान ,या भूमीपूजनासाठी चंद्रकांत गवस, उमाकांत गवस, गोपाळ गवस, रामा गवस, विश्राम चव्हाण, तुकाराम गवस, गणपत गवस, तुकाराम गवस, लाडू गवस, बाळा गवस, गौरव गवस, व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.



