क्रीडातपस्वी कै. शिवाजीराव भिसे सरांना स्मृतिदिनानिमित्त कळसुलकर प्रशालेत अभिवादन!

सावंतवाडी : शहरातील कळसुलकर प्रशालेचे माजी क्रीडा शिक्षक तथा खऱ्या अर्थाने क्रीडातपस्वी ठरलेले कै. शिवाजीराव भिसे सर यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त कळसुलकर संकुलात भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. शिस्त, जिद्द आणि कर्तव्यनिष्ठेचा ध्यास घेत विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या या आदर्श गुरूंच्या आठवणींनी परिसर भारावून गेला.
यावेळी त्यांचे सुपुत्र छायाचित्रकार अनिल भिसे, अरुण भिसे तसेच विद्यार्थीवर्ग, शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरूंच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थिवर्गातील दिलीप वाडकर यांनी शाळेतील मुलांसाठी ५० हजार रुपयांची उदार देणगी जाहीर केली. विशेष म्हणजे, गतवर्षीही त्यांनी इतकीच देणगी देऊन गुरूऋण व्यक्त केले होते.
“आज आपण जे काही आहोत, ते सरांच्या शिस्तीमुळे आणि संस्कारांमुळेच,” अशा शब्दांत वाडकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत गुरूंच्या कार्याला कृतज्ञतेचा मानाचा मुजरा अर्पण केला. स्मृतिदिनाचा कार्यक्रम साधेपणातही भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles