क्रीडा स्पर्धा म्हणजे युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम : भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब. ; रेडी येथील ‘सरपंच चषक – २०२६’ चे थाटात उद्घाटन!

वेंगुर्ला : तालुक्यातील रेडी गाव आज क्रीडामय वातावरणाने भारून गेले होते, निमित्त होते सरपंच रामसिंग राणे पुरस्कृत भव्य ‘सरपंच चषक 2026’ क्रिकेट स्पर्धेच्या शानदार उद्घाटन सोहळ्याचे. या दिमाखदार स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते उत्साह, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषात पार पडले.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने खेळाडूंमध्ये नवचैतन्य संचारले. आपल्या प्रेरणादायी मनोगतात विशाल परब यांनी क्रीडा स्पर्धा या केवळ मनोरंजनाचे साधन नसून युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. खेळातून शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि जिद्द विकसित होते; तसेच गावागावांत एकात्मतेची भावना दृढ होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, सरपंच रामसिंग  राणे, आनंद भिसे (उपसरपंच), सागर रेडकर (ग्राम सदस्य), सागर राणे, ए.टी. राणे, गोपाळ राऊळ तसेच रेडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.

यावेळी विशाल परब यांनी सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा देत, क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडवण्याचे आणि रेडीचे नाव जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.
‘सरपंच चषक 2026’च्या निमित्ताने संपूर्ण गावात उत्साहाचे, ऐक्याचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी सामन्यांसाठी क्रीडाप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles