मुंबई : मुंबईतील वानखेड़े स्टेडियमवर टी 20 वर्ल्डकमधील भारत वि. इंग्लंड हा हायव्होल्टेज सामना झाला. भारताने इंग्लंडला हरवून फायनलमध्ये ध़क मारली. आता 8 मार्च रोजी न्युझीलंड आणि भारत यांच्या विजेतेपदासाठी लढत होणार असून विजेता संघ हा वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना पाहण्यासाठी काल वानखेडेवर अनेक सेलिब्रिटी, तसेच क्रिकेटरही हजर होते, यावेळी कॅप्टन कूल, माही अर्थात महेंद्रसिंग धोनीन यानेही मॅचचा आनंद लुटला. या सेमीफायनलदरम्यान एमएस धोनीची पत्नी साक्षी हिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मॅचच्या शेवटच्या काही षटकांदरम्यान तिने एका चेंडूवर विकेट पडल्याचा विचार करत आनंद साजरा केला, मात्र तो खरा ाऊट नव्हता. साक्षी नाचायला लागलेली पाहून धोनी हसायला लागला आणि त्याने तिला शांत केलं. बुमराहच्या गोलंदाजी दरम्यान घडलेल्या या मजेशीर क्षणाचा व्हिडीओ पाहता पाहता प्रचंड व्हायरल झाला आहे.
18 व्या षटकांत बुमराह गोलंदाजी करत होता, तेव्हा ही मजेशीर घटना घडली. खरंतर, सॅम करनने त्या 18 व्या ओव्हरमधील पहिला चेंडू बुमराहकडे वळवला. ते पाहून साक्षीला वाटलं की बुमराहने झेल टिला आणि भारताला विकेट मिळाली. तेपाहून ती उभी राहून आनंदाने टाळ्या वाजवायला लागली, खूप खुश झाली. पण प्रत्यक्षात, चेंडू बॅटला लागल्यानंतर एकदा जमिनीवर आदळला होता, त्यानंतर बुमराहने तो कॅच टिपला, त्यामुळे फलंदाज आऊट झाला नाही आणि भारताला विकेटही मिळाली नाही.
साक्षीचं सेलिब्रेशन सुरू असताना धोनी तिच्या मागेच उभा होता. तिला झालेला आनंद पाहून आधी तो हैराण झाला आणि नंतर हसत हसतच त्याने तिला शांत केलं. विकेट मिळाली नाहीये, फलंदाज बाद नाहीये असं सांगत त्याने तिला शांत करत खाली बसायला सांगितलं. धोनीने ज्या पद्धीतने साक्षीला ते सांगितलं, तो मजेशीर क्षण आता व्हायरल झाला असून चाहत्यांना हा अंदाज खूप आवडला आहे. धोनी स्वतः देखील साक्षीच्या सेलिब्रेशनवर हसताना होता आणि आजूबाजूच्या लोकांनाही हसू आवरलं नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर अनेक मजेशीर कमेंट्स येत आहेत.



