दोडामार्ग : दोडामार्ग इंग्लिश स्कूलची माजी विद्यार्थीनी कु श्वेता बाबुराव वाघमोडे हिचे शाळेची भौतिक सुविधांची गरज लक्षात घेऊन रूपये 5 हजार रुपये किंमतीची दोन लाकडी कपाटे भेट देण्यात आली. कु श्वेता बाबुराव वाघमोडे ही सध्या पुणे येथे आयटी कंपनीत कार्यरत असून शाळेने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत तिने शाळेप्रती सामाजिक भावनेतून मदत केली आहे.
तिने प्रशालेला केलेल्या या मदतीबद्दल संस्थाध्यक्ष श्री विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ दिनेश नागवेकर, सचिव व्ही बी नाईक, खजिनदार श्री सी एल नाईक, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री. संजय पाटील, पालक- शिक्षक संघाचे सदस्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार मानले.



