फार्मागुडी, फोंडा (गोवा) : गोवा शासन आयटीआय कर्मचारी संघटना (GGITIEA) यांच्या केंद्रीय कार्यकारिणीची २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी निवडणूक उत्साहात पार पडली. या निवडणुकीत नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
यावेळी चेअरमन सय्यद बशीर यांनी मागील कार्यकारिणी बरखास्त केल्याची घोषणा केली. त्यानंतर अध्यक्ष, ऑल गोवा पंचायत सचिव संघटना तथा निवडणूक निरीक्षक शशांक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. निवडणूक निरीक्षक शशांक देसाई यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे सामान्य सचिव सिद्धेश असोलकर यांनी मागील कार्यकाळाचा सविस्तर अहवाल सादर केला. हा अहवाल सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर खजिनदार भूपेश दळवी यांनी आर्थिक अहवाल सादर करून पारदर्शक कामकाजाचा आढावा दिला.
नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर अनिल एच. भोसले यांनी संघटनेची बळकटी, कर्मचारी हक्कांचे संरक्षण आणि विकासात्मक उपक्रम राबविण्यासाठी ठोस व सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ च्यारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन परेश डांगी यांनी मानले.
निवडून आलेले पदाधिकारी –
अध्यक्ष – अनिल एच. भोसले
वरिष्ठ उपाध्यक्ष – सय्यद नासेर अहमद
उपाध्यक्ष – परेश सांखलकर, गजानन नाईक
सामान्य सचिव – सिद्धेश असोलकर
सचिव (अर्थ) – भूपेश दळवी
संयुक्त सचिव – अजीत सावंत, परेश डांगी
प्रशिक्षण सचिव – जयराम प्रिओळकर
प्रेस व मीडिया सचिव – साविदास नाईक, प्रमोद दाफळे
प्रोटोकॉल सचिव – धीरज शेट, मेघश्याम डोंगरीकर
तक्रार निवारण सचिव – सोमनाथ चारी, अजित नाईक
संघटन सचिव – पद्माकर मुळगावकर, विशाल शेट्ये
कार्यकारिणी सदस्य – अमित मांड्रेकर, भूपेश मडकईकर, यशवंत गावकर
प्रशासकीय कायदेशीर सल्लागार – एम. ए. बॉस्को कुटिन्हो
नवीन कार्यकारिणी संघटनेच्या प्रगतीसाठी, कर्मचारी कल्याणासाठी तसेच प्रशासनाशी समन्वय साधून प्रभावी कामगिरी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी सांगितले.



