– सचिन मोरजकर.
सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव येथील रहिवासी नंदकिशोर गुरुदास कासकर यांची एका नामांकित राष्ट्रीयकृत बॅंकेत म्हणजेच कॅनरा बँकेत उपमहाव्यवस्थापक म्हणून बढती मिळाली. त्यांची कॅनरा बँक मधे व्यवस्थापक (विधी) या पदावर सन २००९ मधे नियुक्ती झाली होती. त्यांनी या पुर्वी मुंबई येथे मुख्य शाखा व्यवस्थापक तर कारवार येथे क्षेत्रीय प्रबंधक म्हणून काम पाहिले होते. सावंतवाडी येथील न्यायालयात त्यांनी आपला वकिली व्यवसाय सन २००० साली स्वर्गीय एडवोकेट श्री सत्तार डिंगणकर आणि एडवोकेट श्री परिमल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला. तदनंतर त्यांनी सहायक सरकारी वकील म्हणून सन २००७ ते २००९ साली काम पाहिले. उपमहाव्यवस्थापक पदी बढती मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे



