‘युवाई’च्या दमदार जोशाला अनुभवांची समर्थ साथ! ; दोडामार्गात डिजिटल मीडिया संघटनेचा तुफानी झंजावात! ; प्रमोद गवस, तुळशीदास नाईक सल्लागार तर प्रथमेश नाईक यांची उपसंघटक पदी स्तुत्य निवड.

दोडामार्ग : अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या दोडामार्ग तालुका कार्यकारिणीत नव्याने काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संघटनेची ताकद वाढविणे आणि तालुक्यातील डिजिटल पत्रकारांना अधिक सक्षम व प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
संघटनेच्या मार्गदर्शनासाठी अनुभवी पत्रकार प्रमोद गवस आणि तुळशीदास नाईक यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा संघटनेच्या पुढील वाटचालीत निश्चितच फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.
तसेच प्रथमेश नाईक यांची उपसंघटक पदावर निवड जाहीर करण्यात आली आहे. संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
याशिवाय सदस्य म्हणून प्रथमेश सावंत, सुधाकर धर्णे, किशोर गवस, नारायण नाईक आणि सिया नाईक यांची निवड करण्यात आली आहे.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उपाध्यक्ष ज्येष्ठ संपादक सागर चव्हाण, राज्य संघटक तथा ज्येष्ठ संपादक सीताराम गावडे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कोकण संघटक राजेश नाईक तसेच जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, जिल्हा संघटक आनंद धोंड यांच्या समन्वयातून ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
या नव्या नियुक्त्यांमुळे संघटनेला अधिक बळकटी मिळणार असून, दोडामार्ग तालुक्यातील डिजिटल पत्रकारितेला नवी दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास संघटनेच्या वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles