अशोक खरातचा एन्काऊंटर होणार? ; खासदार प्रणिती शिंदे यांचा खळबळजनक दावा.

मुंबई : नाशिकमधील बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात फसवणूक आणि लैंगिक शोषण प्रकरणी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. भोंदू बाबा अशोक खरात हे प्रकरण आता देशातील मोठ्या लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग घोटाळ्यांपैकी एक मानले जात आहे. तंत्र-मंत्र आणि भविष्यवाणीच्या नावाखाली महिलांचे शोषण करणे, आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग करणे आणि करोडोंची फसवणूक करणे अशा गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणी अनेक राजकीय लागेबांधे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी एक मोठा दावा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. भोंदू बाबा अशोक खरातचे धागेदोरे सत्तेत असलेल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात, त्यामुळे त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो, असे विधान प्रणिती शिंदे यांनी केले.

प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?

हे प्रकरण फक्त एका बाबापुरते मर्यादित नाही. या प्रकरणाचे धागेदोरे सत्तेत बसलेल्या काही बड्या नेत्यांपर्यंत पोहोचू शकतात. जर खरातने चौकशीदरम्यान या नेत्यांची नावे घेईल, तर ती माहिती बाहेर येऊ नये म्हणून त्याचे एन्काउंटर केले जाऊ शकते. म्हणजे, पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला मारले जाण्याची शक्यता आहे, असा मोठा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles