सावंतवाडीत ‘एम जे डान्स अकॅडेमी’चा समर कॅम्प २० एप्रिलपासून. ; महिलांसाठी ‘बॉलीवुड झुंबा’चे स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात येणार.

सावंतवाडी: शहरातील एम जे डान्स अकॅडमीच्या वतीने यंदा उन्हाळी सुट्टीत खास नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘समर कॅम्प २०२६’ अंतर्गत हे शिबिर मंगळवार, दि. २० एप्रिल ते १० मे या कालावधीत पार पडणार आहे.
२० दिवसांच्या या शिबिरामध्ये नृत्याचे मूलभूत ते प्रगत असे विविध प्रकार शिकविण्यात येणार असून, सहभागींसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे. विशेष म्हणजे महिलांसाठी ‘बॉलीवुड झुंबा’चे स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनुभवी डान्स कोरिओग्राफर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण होणार असल्याने नृत्याची आवड असणाऱ्यांना आपले कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
शिबिरासाठी प्रवेश शुल्क रुपये १२०० इतके ठेवण्यात आले असून, सहभागी सर्वांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील इच्छुकांना या शिबिरात सहभागी होता येणार आहे.
हे शिबिर एम जे डान्स अकॅडमी, पहिला मजला, संचयानी बिल्डिंग, सावंतवाडी येथे दररोज सायंकाळी ३ ते ५ या वेळेत होणार आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९५४५४७२१५२ किंवा ९०७५८५१२३९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles