सावंतवाडी नगरपरिषदेच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा. ; विकासकामांना गती देण्याच्या सूचना.

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : सावंतवाडी नगरपरिषदेतील विविध कामकाजाचा आढावा घेण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, वित्तीय व्यवहार आणि प्रशासकीय कार्यपद्धती यांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी आज नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला नगरपरिषदेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर विषयसूचीत असलेल्या 19 महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेताना, शासनाच्या कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

यावेळी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रशासकीय सुधारणा करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नगरपरिषदेच्या प्रलंबित कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन केंद्रासह विविध विकासकामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles