धार्मिक अन् सांस्कृतिक परंपरा कोकणच्या सामाजिक ऐक्याला बळ देतात! : भाजपा युवा नेते विशाल परब. ; विशाल परब यांची सपत्नीक आडाळी येथे श्री देवी माऊली चरणी भक्तिभावाने उपस्थिती.

दोडामार्ग : कोकणातील युवा नेतृत्वामध्ये आपल्या कार्यशैली, सामाजिक बांधिलकी आणि जनसंपर्कामुळे विशेष ओळख निर्माण करणारे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज आडाळी येथील श्री देवी माऊली पंचायतन देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास पत्नी सौ. वेदिका परब यांच्यासह सदिच्छा भेट देत धार्मिक वातावरणात सहभाग नोंदविला.
सध्या आडाळी गाव भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याच्या वातावरणाने भारावून गेले असून पंचायतन देवतांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले आहे. या मंगल सोहळ्यास उपस्थित राहत विशाल परब यांनी विधिवत देवदर्शन घेत कोकणवासीयांच्या सुख-समृद्धी, शांतता आणि उज्ज्वल भविष्यासाठी श्री देवी माऊली चरणी प्रार्थना केली.


मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरण, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींनी भारलेले वातावरण अनुभवत त्यांनी काही काळ ग्रामस्थ आणि भाविकांसोबत संवाद साधला. यावेळी विशाल परब यांनी देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे अभिनंदन करत, अशा धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा कोकणच्या सामाजिक ऐक्याला अधिक बळ देतात, असे गौरवोद्गार काढले.

“कोकणातील प्रत्येक कुटुंब आनंदी, समृद्ध आणि सुरक्षित राहो. समाजात शांतता, ऐक्य आणि सकारात्मक ऊर्जा कायम नांदो,” अशी भावनिक प्रार्थना त्यांनी श्री देवी माऊलीच्या चरणी केली.
या प्रसंगी स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. विशाल परब यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष उत्साह आणि आकर्षण प्राप्त झाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles