सावंतवाडी : ज्ञानज्योत अकॅडेमी पुणे या संस्थेचे संचालक, अभ्यासू व्यक्तिमत्व प्रा. गणेश हुरसाळे यांचा नुकताच ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षणरत्न’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या तेराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.


प्रा. गणेश हुरसाळे यांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण अण्णा नेरकर, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत दारोळे, ज्ञानज्योत अकॅडेमी, पुणेचे संचालक प्रा. विजयकुमार कौदरे, सीईओ प्रा. राजाराम परब आदी मान्यवरांच्या हस्ते प्रा. गणेश हुरसाळे यांना आदर्श शिक्षणरत्न पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, आरोग्य, पत्रकारिता, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योजक, वैद्यकीय, प्रभावशाली राजकीय युवा व्यक्तिमत्व आणि प्रशासन आदी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या वतीने गौरव करण्यात आला.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी दुरुस्त प्रणालीद्वारे या सोहळ्याला उपस्थित राहून स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले व सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजाराम परब यांनी केले. आभार प्रदर्शन व्यवस्थापक कृष्णा तेलंग यांनी केले. प्रा. हुरसाळे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
प्रा. गणेश हुरसाळे यांना शिक्षण क्षेत्रातील तब्बल २० वर्षे असा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी इयत्ता 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध पद्धतीने Tricks & Tactics चा वापर करून Book Keeping & Accountany तसेच इ.9 वी व 10 वीच्या विद्यार्थ्यांना हसत खेळत, सोप्या भाषेत सुत्रपद्धतीने English Grammar शिकवण्याचा अनुभव प्राप्त केलाय. या सर्व गोष्टींमुळे इ.10 वी व 12 वी बोर्ड परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये भरघोस वाढ झाली.
तसेच प्रा. हुरसाळे विविध सस्थांमध्ये सहभाग देत आहेत. यात डायरेक्टर ज्ञानज्योत अकॅडमी, पुणे, सचिव, दे आई सेवा प्रतिष्ठान, तसेच विश्वस्त, स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्था, पुणे.
प्रा. हुरसाळे यांना या अगोदर विश्वमाता फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल इनोव्हेटिव्ह टीचर्स ऑफ इंडिया नॅशनल अवॉर्ड प्राप्त- आदर्श शिक्षक पुरस्कार, सकाळ माध्यम समूहाकडून ‘ संघर्ष यशोगाथा पुरस्कार, MKCL कडून ‘आदर्श शिक्षक ‘ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
तसेच प्रा. गणेश हुरसाळे सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. त्यांनी सलग 13 वर्षे आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शनपर व्याख्याने दिली आहेत. रोटरी क्लब तसेच सकाळ वृत्तपत्र समुहाचे न्यूजपेपर इन एज्युकेशन (NIE) अंतर्गत इ. 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने, शैक्षणिक व सामाजिक कार्याची विविध प्रसार माध्यमांनी घेतली दखल. (उदा. विविध वृत्तपत्रातील बातम्या व लेख), आदिवासी कातकरी पाड्यांवर जाऊन दिवाळीमध्ये फराळाचे वाटप, खेड, शिरूर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर येथील आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संस्थांच्या माध्यमातून शेकडो सायकलींचे मोफत वाटप, 2008 सालापासून ते आजतागायत स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, हुशार व होतकरू अशा शेकडो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप, दुर्गम आदिवासी भागातील व्यक्तींसाठी सर्व रोग निदान मोफत आरोग्य शिबीर व औषधोपचार तसेच डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप, खेड्यातील विविध जि. प. प्राथमिक शाळांना संगणक, प्रिंटर, ई- लर्निंग सॉफ्टवेअरचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या-पुस्तके, इंग्लिश डिक्शनरी, टिफिन बॉक्सचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना टी शर्ट, शूज, खेळाचे साहित्य तसेच रात्र अभ्यासिकेसाठी ट्यूब लाईट्सचे वाटप., कलमी रोपांचे वाटप व वृक्षारोपण., स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेच्या वाचन अभियानांतर्गत भोर तालुक्यातील 5,000 विद्यार्थ्यांना वर्षातून तीनवेळा पासवर्ड अंकाचे वाटप तसेच 3 ते 6 वयोगटातील मुलांच्या अंगणवाड्या सुंदर, सुशोभित करून रंगवून दिल्या आहेत.
अशा गुणवंत शिक्षण रत्नाला पुरस्कार देताना स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाला अभिमान वाटत असून विशेष आनंद होत असल्याची भावना स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील व्यक्त केली.