सावंतवाडी : माजगाव जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लॉरेन्स अँड मेयो यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर नागरिकांसाठी मोठी आरोग्यसेवा ठरणार आहे.
हे नेत्रतपासणी शिबिर गुरुवार दिनांक २८ मे २०२६ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. विक्रांत सावंत यांच्या निवासस्थानी, जि.प. प्राथमिक शाळा नं. ३ शेजारी, माजगाव हरसावंतवाडा येथे हे शिबिर पार पडणार आहे.
डोळ्यांच्या विविध आजारांचे निदान, तपासणी तसेच तज्ज्ञांकडून मार्गदर्शन या शिबिरात करण्यात येणार असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी नाळ जोडणारे विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचे परिसरात स्वागत होत असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



