सावंतवाडी : वेत्ये सरपंच गुणाजी गावडे पुरस्कृत श्री कलेश्वर कला क्रीडा मंडळ, वेत्ये यांच्या वतीने माजगाव जिल्हा परिषद सदस्य विक्रांतभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याअंतर्गत ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित मराठी चित्रपट ‘राजा शिवाजी’ याचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, वेत्ये परिसरातील ग्रामस्थांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हा चित्रपट आज गुरुवार दिनांक २८ मे २०२६ रोजी रात्री ठीक ९ वाजता श्री कलेश्वर पुरविदेवी मंदिर, वेत्ये येथे दाखविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित असलेल्या या चित्रपटामुळे युवकांमध्ये इतिहासाविषयी प्रेरणा आणि अभिमान निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
विक्रांतभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात स्वागत होत असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



