‘पावसाच्या सरींत व्यापाऱ्यांसाठी मायेच्या आधाराची छत्री’ ; युवा नेते विशाल परब यांचा सेवाभाव हृदयस्पर्शी! ; ‘पावसापासून संरक्षण, सेवाभावातून समर्पण’ ब्रीदवाक्याला कृतीतून न्याय, मळेवाड, शिरोडा अन् रेडी येथे व्यापाऱ्यांना व्यावसायिक छत्र्यांचे वाटप.

✍️ रूपेश पाटील.

सावंतवाडी : “पावसापासून संरक्षण, सेवाभावातून समर्पण” या ब्रीदवाक्याला साजेसा सेवाभाव प्रत्यक्ष कृतीतून जपत महाराष्ट्र भाजप युवा नेते विशालजी परब यांनी मळेवाड तिठा, शिरोडा बाजारपेठ आणि रेडी गणपती मंदिर परिसरात लहान व्यापाऱ्यांना व्यावसायिक छत्र्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श घालून दिला. पावसाच्या सरींमध्ये रोजीरोटी कमावणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या अडचणी ओळखून त्यांना दिलासा देणारा हा उपक्रम अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला.
पावसाळ्यात व्यापार सुरू ठेवण्यासाठी छत्री ही केवळ एक वस्तू नसून, अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे संरक्षण करणारे कवच ठरते. हीच जाणीव ठेवून विशालजी परब यांनी व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा आणि त्यांच्या संघर्षात खंबीरपणे सोबत उभे राहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून व्यापाऱ्यांनीही कृतज्ञता व्यक्त केली.


विशेष म्हणजे, डोळ्यासमोर कोणतीही निवडणूक नसताना केवळ सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम अधिकच लक्षवेधी ठरला आहे. प्रसिद्धीपेक्षा समाजहिताला प्राधान्य देत केलेली ही मदत म्हणजे सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्तम उदाहरण असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
“राजकारण केवळ सत्तेसाठी नसते, तर समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी असते,” हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत व्यापाऱ्यांना आधाराची छत्री मिळाली आणि सेवाभावाच्या या कृतीने अनेकांच्या मनात आपलेपणाची ऊब निर्माण केली. त्यामुळे “पावसापासून संरक्षण, सेवाभावातून समर्पण” हे ब्रीदवाक्य आज केवळ शब्दांत नाही, तर प्रत्यक्ष कृतीतूनही सार्थ ठरल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


मळेवाड तिठा येथे महाराष्ट्र भाजप युवा नेते विशालजी परब यांच्यासह सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, जिल्हा परिषद सदस्या सौ. अपर्णा सातोसकर, ओंकार प्रभू, माजी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, विकास परब, केतन आजगांवकर, गिरीश परब, बंड्या दळवी, बंटी जामदार, विजू साटेलकर, धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.


शिरोडा बाजारपेठेत माजी सरपंच मनोज उगवेकर, केंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर, आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक, शिरोडा शहराध्यक्ष अमित गावडे, वेंगुर्ला तालुका युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गावडे, वेंगुर्ला तालुका चिटणीस श्रीकृष्ण धानजी, शिरोडा युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, युवा नेतृत्व संतोष धानजी, भाजप पदाधिकारी चंद्रशेखर गोडकर, अशोक परब, बाबल गावडे, प्राजेश गावडे, दादा शेटये, बाळकृष्ण परब, दत्ताराम फटजी, विद्याधर धानजी, तुषार म्हाकले, दीपक नाटेकर, आरवली महिला पदाधिकारी रिमा मेस्त्री, आसोली शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, आरवली सरपंच समीर कांबळी, ग्रामपंचायत सदस्य तातोबा कुडव, लक्ष्मीकांत कर्पे, श्रीकांत राजाध्यक्ष, सदगुरु मलबारी, शिवा तारी, किरण तांडेल यांच्यासह व्यापारी, भाजप हितचिंतक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रेडी येथे सरपंच रामसिंग (भाई) राणे, उपसरपंच आनंद भिसे, ग्रामपंचायत सदस्य नमिता नागोलकर, रश्मी रेडकर, सागर रेडकर, सामाजिक कार्यकर्ते सागर राणे, दीपक राणे, दिलीप राणे, दर्शन कांबळी, संजय कांबळी, विनायक कांबळी, बबन कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजाच्या गरजा ओळखून, कोणत्याही राजकीय अपेक्षेशिवाय लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची वृत्तीच खऱ्या लोकनेत्याची ओळख असते. विशालजी परब यांनी राबविलेल्या या उपक्रमाने पावसात भिजणाऱ्या लहान व्यापाऱ्यांना केवळ छत्रीच नव्हे, तर माणुसकीचा आधार दिला. त्यामुळे हा उपक्रम व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक ठरला असून, सेवाभावाचे हे उदाहरण सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles