मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मसिआ’च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य शपथविधी  सोहळा! ; कोकणच्या औद्योगिक विकासावर होणार महत्त्वपूर्ण मंथन.

मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) या प्रतिष्ठित संस्थेच्या २०२६ ते २०२८ या कार्यकाळासाठी निवडून आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदस्यांचा भव्य शपथग्रहण सोहळा शनिवार, दि. ४ जुलै, सायंकाळी ४ वाजता, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याने या कार्यक्रमाकडे उद्योग व व्यापारी क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे.
यावेळी कोकण विभागाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे व त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून निवडून आलेले गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गव्हर्निंग कौन्सिल सदस्य ॲड. नकुल पार्सेकर, राजन नाईक, मनोज वालावलकर, विजय केनवडेकर, मिलिंद प्रभू आणि कुणाल ओरसकर हे नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


शपथग्रहण सोहळ्यानिमित्त कोकणातील उद्योग-व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, उद्योजकांच्या विविध प्रलंबित मागण्या तसेच गुंतवणूक व औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मसिआच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर विचारविनिमय होणार आहे. त्यामुळे हा सोहळा केवळ शपथविधीपुरता मर्यादित न राहता, कोकणच्या औद्योगिक प्रगतीचा नवा आराखडा ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या या ऐतिहासिक शपथग्रहण सोहळ्यास राज्यभरातून निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी, उद्योजक व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे आणि ट्रस्ट बोर्डाचे चेअरमन आशिष पेडणेकर यांनी केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles