अनुभवी कार्यकर्त्यांच्या बळावर सिंधुदुर्गातील सहकार अधिक सक्षम करू! : मनीष दळवी. ; सहकार सप्ताहाचा जिल्हा बँकेत शुभारंभ!, नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थेची स्थापना.

सिंधुदुर्गनगरी : भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सहकार सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते सहकार ध्वजारोहण करण्यात आले. तसेच ‘सिंधुदुर्ग जिल्हा बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित’ या नव्या संस्थेची स्थापना करून तिच्या कार्याचा शुभारंभही करण्यात आला.

यावेळी बोलताना अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, “बहुउद्देशीय संस्थेमार्फत विविध सहकारी संस्थांना कमी खर्चात दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रशिक्षित कर्मचारी वर्ग तयार होऊन सहकार क्षेत्र अधिक सक्षम होईल. प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा जिल्हा बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील. सहकार मंडळ आणि बहुउद्देशीय संस्था एकत्रितपणे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी काम करतील. सहकार क्षेत्रात कार्यरत सर्व कार्यकर्ते एकत्र आल्यास त्यांच्या अनुभवाचा लाभ संपूर्ण जिल्ह्याला होईल आणि त्यातून सिंधुदुर्गातील सहकार अधिक समृद्ध करण्याचा मार्ग मोकळा होईल.”

यानंतर जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात नव्याने स्थापन झालेल्या बहुउद्देशीय संस्थेची पहिली सभा पार पडली. या सभेत मनीष दळवी यांची संस्थेच्या सभाध्यक्षपदी, तर संदेश हडकर यांची संस्थेच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली. दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सहकार अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. सहकार गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपविधी, उद्दिष्टे व भावी कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडण्यात आला.

या कार्यक्रमाला माजी आमदार अजित गोगटे, सहा निबंधक श्री. मरभळ, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक श्री. हिरलेकर, संस्था निबंधक श्री. आरेकर, जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, दिलीप रावराणे, रवींद्र मडगावकर, प्रकाश मोर्ये, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, गणपत देसाई, समीर सावंत, विद्याप्रसाद बांदेकर, तुळशीदास रावराणे, नासीर काझी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, नव्याने स्थापन झालेल्या संस्थेचे संचालक मंडळ, सभासद आणि सहकार खात्यातील अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles