टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक. ; ठाणे पोलिसांची कारवाई.

ठाणे : महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत कथित मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता यांच्या पत्नीला बिहारमधील पाटणा येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे पेपरफुटी रॅकेटचा तपास अधिक वेगाने सुरू झाला असून संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील कोनगाव परिसरात सापळा रचून टीईटी परीक्षेच्या चार प्रश्नपत्रिका जप्त केल्या होत्या. चौकशीदरम्यान अटक आरोपींनी बिहारचा रहिवासी असलेल्या बिजेंद्र कुमार गुप्ता याचे नाव या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून घेतल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, गुप्ता यांच्यावर यापूर्वीही विविध राज्यांतील परीक्षा पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभागाचे आरोप झाले असून ते अनेक वेळा अटकेपासून बचाव करण्यात यशस्वी ठरले आहेत.

दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्याच्या शक्यतेची तपासणी सुरू आहे. सध्या विशेष तपास पथक (एसआयटी) या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात टीईटीसह सर्व राज्यस्तरीय परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles