सचिन आहेर यांना उमेदवारी जाहीर होताच निलम गोऱ्हे नाराज? ; दिले ‘या’ एका शब्दात उत्तर.

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून थेट सचिन आहिर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महायुतीमध्ये उपसभापती पद शिवसेना शिंदे गटाकडून आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या उमेदवारीसाठी जोरदार चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांना उमेदवारी जाहीर करत त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. सलग दुसऱ्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यात आला. सचिन आहिर यांनी एकनाथ शिंदे यांचा हात पकडला. 6 खासदारांसोबतच आता सचिन आहिर देखील शिवसेना शिंदे गटाच्या गळ्याला लागले. एका मागून एक धक्के शिंदे गटाने ठाकरेंना दिली. अजूनही राज्यात ऑपरेशन टायगर सुरू असल्याचे दिसतंय. त्यामध्येच आता थेट सचिन आहिर यांना उमेदवारी जाहीर झाली.

उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू होती. निलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, आता शिवसेना शिंदे गटाकडून सचिन आहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावर आता निलम गोऱ्हे यांची पहिली प्रतिक्रिया आली.

निलम गोऱ्हे यांनी म्हटले की, मी नाराज नाहीये. सचिन आहिर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज भरला आहे. मी नाराज नाहीये. भाजपाच्या नाराजीचा उपसभापती निलम गोऱ्हे यांना फटका बसला का? असाही प्रश्न यादरम्यान उपस्थित होतो. सातारा झेडपी निवडणूक घडामोडींमुळे गोऱ्हेंना फटका बसल्याची चर्चा आहे. सातारा एसपीच्या निलंबन आदेशामुळे गोऱ्हेंनी नाराजी ओढवली होती.

त्याचा हा फटका असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, मी नाराज नाहीये. निलम गोऱ्हे यांनी यावर फार काही बोलणे टाळले आहे. आता निलम गोऱ्हे यांच्यावर नवीन कोणती जबाबदारी पक्षाकडून दिली जाते, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles