सावंतवाडी: येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या कथ्थक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. प्रारंभिक परीक्षेत इयत्ता ४थी मधील कु.आद्या कुंभार हिने प्रथम श्रेणी प्राप्त केली. तसेच इयत्ता ८ वी मधील कु. हीना सारंग हिने द्वितीय श्रेणी मिळवत उत्कृष्ट कामगिरी दर्शविली.
या विद्यार्थिनींना प्रशालेच्या कथ्थक शिक्षिका व संचालिका सौ. काश्मिरा पाटणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थिनींचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षिकेचे संस्थेचे संचालक ॲड. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थिनींना त्यांच्या पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
कथ्थकच्या तालावर स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा यशाचा ठेका! ; गांधर्व परीक्षेत विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]



