कुटुंबियांच्या प्रेमळ सान्निध्यात आ. केसरकरांचा वाढदिवस उत्साहात! ; मुंबईत केक कापून परिवारासह वाढदिवस साजरा, सावंतवाडी मतदारसंघातही सामाजिक उपक्रमांची भरभरून उधळण!

सावंतवाडी : जनतेच्या मनात विकासाभिमुख नेतृत्वाची ठाम ओळख निर्माण करणारे माजी मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस मुंबई येथील निवासस्थानी कुटुंबियांच्या प्रेमळ सहवासात अत्यंत आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कुटुंबियांनी केक कापून त्यांचे औक्षण करत निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी त्यांच्या पत्नी, माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर तसेच नातू अर्जून यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळ्याने भरलेल्या या कौटुंबिक क्षणांनी वाढदिवसाचा आनंद अधिकच द्विगुणित केला.

दरम्यान, आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान शिबिरे, सत्कार समारंभ, जनहिताचे कार्यक्रम अशा उपक्रमांमधून कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांच्याविषयीचा स्नेह व आदर व्यक्त केला.

जनसेवा, विकास आणि साधेपणाची परंपरा जपणाऱ्या दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघासह कुटुंबातही आनंदाचे आणि शुभेच्छांचे वातावरण अनुभवायला मिळाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles