१० ऑगस्टला भव्य तिरंगा यात्रा, हजारो नागरिकांच्या सहभागाचा अंदाज. – युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत नियोजनाला अंतिम स्वरूप.
सावंतवाडी : ‘हर घर तिरंगा… घराघरात तिरंगा, मनामनात राष्ट्रभक्ती!’ या देशभक्तीच्या भावनेला कृतीची जोड देत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ‘हर घर तिरंगा यात्रा २०२६’ अभूतपूर्व उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे. येत्या सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी सावंतवाडी शहरातून निघणारी ही भव्य तिरंगा यात्रा ‘न भूतो न भविष्यती’ ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात ‘हर घर तिरंगा यात्रा अभियान २०२६’च्या संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत यात्रेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सावंतवाडी नगरपरिषद उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप तसेच भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्री देव उपरलकर मंदिरापासून राष्ट्रभक्तीचा निनाद!
सोमवार, १० ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १० वाजता सावंतवाडी येथील श्री देव उपरलकर मंदिर परिसरातून या भव्य तिरंगा यात्रेला प्रारंभ होणार आहे. हातात तिरंगा, ओठांवर देशभक्तीच्या घोषणा आणि मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत घेऊन हजारो नागरिक या यात्रेत सहभागी होणार आहेत.
या यात्रेत सुमारे ५ ते ६ हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित असून, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रभक्तीचा एक भव्य सोहळा साकारण्याच्या दृष्टीने भाजपा संघटनेने जोरदार तयारी सुरू केली आहे.
‘तिरंगा हा केवळ ध्वज नाही, तर तो देशाच्या स्वाभिमानाचे, त्यागाचे आणि अखंड एकतेचे प्रतीक आहे,’ या भावनेतून प्रत्येक घरापर्यंत तिरंगा आणि प्रत्येक मनामध्ये राष्ट्रभक्ती पोहोचविण्याचा निर्धार या अभियानातून व्यक्त करण्यात आला.
हजारोंच्या उपस्थितीचे आवाहन-
ही यात्रा केवळ राजकीय कार्यक्रम न राहता राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा लोकोत्सव ठरावा, यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग आणि आंबोली परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने संपूर्ण मतदारसंघात या यात्रेची उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाजपा पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती –
या बैठकीस भाजपा युवानेते विशाल परब, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, दोडामार्गचे माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, दोडामार्ग मंडल अध्यक्ष दीपक गवस, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष विष्णू परब, सावंतवाडी मंडल महिला अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर, सावंतवाडी मंडल युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, सावंतवाडी मंडल संयोजक सौ. दीपाली भालेकर, सहसंयोजक प्रतीक बांदेकर, सौ. सुकन्या टोपले, बांदा मंडल संयोजक सिद्धेश महाजन, सहसंयोजक अष्टविनायक धाऊसकर, वेंगुर्ला मंडल सहसंयोजक सचिन शेट्ये, दोडामार्ग मंडल सहसंयोजक अंकुश नाईक, सुनील गवस, आंबोली मंडल संयोजक विनेश तावडे, सहसंयोजक दादा परब, सागर ढोकरे यांची उपस्थिती होती.
यावेळी सावंतवाडी नगरसेविका सौ. सुनीता पेडणेकर, सौ. दुलारी रांगणेकर, सौ. निलम नाईक, वेंगुर्ला नगरसेवक विनय नेरुरकर, नगरसेविका सौ. गौरी माईणकर, सौ. गौरी मराठे, अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष पुंडलिक कदम, अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष ड्युमिंग आल्मेडा, सावंतवाडी मंडल सरचिटणीस संतोष तळवणेकर, चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, शिवा गावडे, केदार म्हसकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
१० ऑगस्टला सावंतवाडीच्या रस्त्यांवर तिरंग्याची शान, देशभक्तीचा अभिमान आणि राष्ट्रप्रेमाचा जयघोष पाहायला मिळणार असून, ‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांच्या तिरंगामय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे.



