सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची नुकतीच जिल्हा विशेष शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे बदली झाली आहे. सावंतवाडीतील कार्यकाळात त्यांनी प्रामाणिकपणे आणि जनहिताला प्राधान्य देत केलेल्या कार्याची दखल घेत माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी सुशिल चौगुले यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांचे अभिनंदन केले तसेच सावंतवाडीतील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कौतुक व्यक्त केले. नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यावर योग्य पद्धतीने कार्यवाही करण्याच्या त्यांच्या भूमिकेचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
सावंतवाडीतील कार्यकाळात चव्हाण यांनी कायदा-सुव्यवस्था राखताना जनतेशी संवाद साधत आपली जबाबदारी पार पाडली. त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी सुशील चौगुले यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला पुढील काळातही यश मिळो, अशी सदिच्छा व्यक्त केली.



