सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक राजन पोकळे यांचा वाढदिवस आज शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांना निवडून आणून आपल्याला वाढदिवसाची खरी भेट द्यावी, अशी सदिच्छा वाढदिवसानिमित्त श्री. पोकळे यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याजवळ व्यक्त केली.