इन्सुलीत २२ ऑगस्ट रोजी रंगणार रानभाज्यांची मेजवानी!, सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब, विशाल परब यांची विशेष उपस्थिती. ; रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन, महिलांसाठी आकर्षक पारितोषिकांची लयलूट!

सावंतवाडी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या वतीने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २२ ऑगस्ट रोजी नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे हा महोत्सव रंगणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन सौ. वेदिका परब यांच्या हस्ते दुपारी दोन वाजता होणार आहे. यावेळी महाराष्ट्र भाजपाचे युवानेते विशाल परब यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर प्रमुख वक्ते, तर सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे, इन्सुली सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, विद्या विकास मंडळ इन्सुलीचे अध्यक्ष महेंद्र सावंत, उपाध्यक्ष सचिन दळवी, सचिव गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार सदानंद कोरगांवकर, मुळदे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, डॉ. रणजीत देव्हारे, सहाय्यक विस्तारतज्ज्ञ डॉ. गिरीष उईके, सहाय्यक प्राध्यापक डॉ. जया वाघडॉ. निलिमा पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पाककला स्पर्धेत आकर्षक बक्षिसे –

रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित पाककला स्पर्धेत सहभागी महिलांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी इलेक्ट्रिक कुकर, द्वितीय क्रमांकासाठी विद्युत प्रवर्तन, तृतीय क्रमांकासाठी समई, चतुर्थ क्रमांकासाठी कुकर, तर पाचव्या क्रमांकासाठी इस्त्री देण्यात येणार आहे. याशिवाय महोत्सवात सहभागी होणाऱ्या महिलांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.

पारंपरिक खाद्यसंस्कृतीला मिळणार उजाळा –

रानभाज्यांचे पोषणमूल्य, आरोग्यदायी महत्त्व तसेच कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीमध्ये असलेले त्यांचे स्थान नागरिकांपर्यंत पोहोचविणे, हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या स्थानिक संसाधनांचा योग्य व कल्पक वापर करून पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करण्याबाबतही या उपक्रमातून जनजागृती केली जाणार आहे.

रानभाज्यांच्या माध्यमातून पारंपरिक चवीला आधुनिक पाककलेची जोड देणाऱ्या या महोत्सवात नागरिकांनी, विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles