प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद खानोलकर यांना बांदा नट वाचनालयात भावपूर्ण श्रद्धांजली!

बांदा :  प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद खानोलकर यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत बांदा नट वाचनालयाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. खानोलकर यांच्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवेचा तसेच समाजातील विविध घटकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला. बालरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी अनेक वर्षे परिसरातील बालकांवर उपचार करताना केवळ वैद्यकीय सेवा न देता रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांशी आपुलकीचे नाते जपले. त्यांच्या शांत, संयमी आणि प्रसंगी कठोर स्वभावामुळे ते रुग्णांच्या कुटुंबीयांमध्ये विशेष लोकप्रिय होते.
डॉ. खानोलकर हे वैद्यकीय क्षेत्रापुरते मर्यादित न राहता सामाजिक व सार्वजनिक जीवनातही सक्रिय होते. बांदा परिसरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांना त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शोकसभेत उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना डॉ. खानोलकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू अधोरेखित केले. त्यांचा साधेपणा, माणुसकी, रुग्णांप्रती असलेली आस्था आणि समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड कायम स्मरणात राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत डॉ. अरविंद खानोलकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात बांदा नट वाचनालय तसेच उपस्थितांनी सहभागी असल्याचे यावेळी व्यक्त केले.
यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, जगन्नाथ सातोस्कर, शंकर नार्वेकर, स्वप्निता सावंत, गुरुनाथ नार्वेकर, हरिश्चंद्र भिसे, बाबी वसकर, सुनील नातू, सचिन चांदेकर, प्रकाश शिर्के, म गो सावंत, लक्ष्मण पावसकर, सुजन चांदेकर, दत्तात्रय कारंदे, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, हितांशी केळुस्कर, अमिता परब आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles