सावंतवाडी : आज वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येक रुपयाची किंमत वाढली असताना सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला दिलासा देणारे आणि ‘दर्जेदार वस्तू, माफक दर आणि मोठी बचत’ हे त्रिसूत्री घेऊन सावंतवाडीच्या बाजारपेठेत ‘स्वामी समर्थ बजेट बाझार 99’ या नव्या दालनाचे दिमाखात आगमन झाले आहे.

गांधी चौक परिसरातील आदित्य बिझनेस सेंटर बिल्डिंगमध्ये सुरू करण्यात आलेल्या या आकर्षक दालनाचे नुकतेच उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले. सत्यार्थ न्यूज चॅनलचे संपादक रुपेश पाटील आणि ब्रेकिंग मालवणीचे संपादक अमोल टेंबकर यांच्या हस्ते फित कापून या दालनाचे उद्घाटन झाले. यावेळी कोकण दर्शन डिजिटल मीडियाचे संपादक आनंद धोंड आणि सकाळचे पत्रकार निलेश मोरजकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
‘उद्दिष्ट एकच… ग्राहकांची मोठी बचत!’
‘उद्दिष्ट एकच, ग्राहकांची मोठी बचत’ हे ब्रीद घेऊन ग्राहकांच्या सेवेत दाखल झालेल्या या बजेट बाझारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे विविध दर्जेदार वस्तू ऑनलाइन बाजारपेठेपेक्षाही स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बचतीसोबत दर्जेदार खरेदीचा अनुभव ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार आहे.
घरापासून फॅशनपर्यंत… सगळं काही एका छताखाली!
या दालनात ग्राहकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या विविध वस्तूंची मोठी श्रेणी उपलब्ध आहे. यामध्ये होम अप्लायन्सेस, फूटवेअर, भेटवस्तू, सौंदर्य प्रसाधने, मोबाईल ॲक्सेसरीज, डोअर कर्टन्स, डोअर मॅट, साडी कव्हर, वही-पेन व स्टेशनरी साहित्य, ज्यूट बॅग्स, वॉलेट्स यांसह रोजच्या वापरातील असंख्य वस्तूंचा समावेश आहे.
विशेष म्हणजे कमी किमतीत अधिक वस्तू आणि त्यासोबत दर्जाची खात्री, यामुळे सर्वसामान्य ग्राहकांपासून महिला, विद्यार्थी आणि कुटुंबीयांसाठी हे दालन खरेदीचे नवे आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.
सावंतवाडीकरांना खरेदीचे नवे ‘बजेट डेस्टिनेशन’!
या नवीन दालनाच्या प्रोप्रायटर अंकिता अर्जुन परब यांनी सावंतवाडी व परिसरातील नागरिकांनी ‘स्वामी समर्थ बजेट बाझार 99’ला आवर्जून भेट देऊन दर्जेदार वस्तूंच्या खरेदीसोबत बचतीचा मनमुराद लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
उद्घाटन सोहळ्याला जयसिंग देसाई, चंद्रकांत परब, विनय देसाई, अपर्णा परब, सरिता देसाई, आशिष धोंड यांच्यासह स्थानिक नागरिक आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महागाईच्या काळात ग्राहकांच्या खिशाला दिलासा देत ‘बचतही… दर्जाही!’ असा विश्वास निर्माण करणारे ‘स्वामी समर्थ बजेट बाझार 99’ सावंतवाडीच्या खरेदी विश्वात नवे पर्व सुरू करणार का, याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.



