मनोज जरांगे यांची प्रकृती अजून खालावली, रात्री अडीच वाजता कुणाचा फोन आला?, खडबडून जाग आलेल्या सरकारने काय शब्द दिला?

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास दोन दिवसांपूर्वी नकार दिला होता. त्यांच्या या भूमिकेने मराठा आंदोलक काळजीत पडले होते. दरम्यान काल रात्री मध्यरात्री जरांगे पाटील यांची तब्येत अजून खालावली. त्यानंतर सरकार खडबडून जागे झाले आणि त्यांनी एक मोठा शब्द दिला.

https://youtube.com/shorts/MTTsk6Pq7LE

मध्यरात्री जरांगे यांची प्रकृती खालावली –

मध्यरात्री मनोज जरांगे यांची तब्येत अचानक खालावली. त्यांचे वजन कमी झाले असून शुगर आणि बीपी देखील कमी झाला. रात्री अडीच वाजता तपासणी केल्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याची माहिती मंत्र्यांना देण्यात आली. ही मिळताच मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी फोन करून सकाळपासून कार्यवाही सुरू करतो असे आश्वासन दिल्यानंतर सलाईन घेतले‌. सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण न सोडण्याची भूमिका त्यांनी पुन्हा जाहीर केले. प्रकृती खालावल्यानंतर मध्यरात्री मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखत टायर जाळले तर आज देखील आंदोलनं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://youtu.be/zdLyMCeoncQ

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles