सुदेश नेवगी यांच्या शिरपेचात मानाचा तुरा!, महाराष्ट्र शासनाकडून ‘विशेष कार्यकारी अधिकारी’पदी नियुक्ती. ; पाच वर्षांसाठी जबाबदारी, सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव!

सावंतवाडी : सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनसामान्यांशी आपुलकीचे नाते जोडत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुदेश सुनील नेवगी यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक वाटचालीला मिळालेली ही शासकीय स्तरावरील महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारसीनुसार सुदेश नेवगी यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना ३ नोव्हेंबर २०२६ ते २ नोव्हेंबर २०३१ अशा पाच वर्षांच्या कालावधीसाठी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांशी सातत्याने संवाद साधणाऱ्या आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या सुदेश नेवगी यांच्या या निवडीमुळे त्यांच्या कार्याचा सन्मान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्यावर नव्या जबाबदारीची धुरा सोपविण्यात आली असून, आगामी काळात त्यांच्या माध्यमातून जनहिताची कामे अधिक प्रभावीपणे होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या निवडीबद्दल पालकमंत्री नितेश राणे, भाजपाचे राज्य युवा नेते विशाल परब यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी सुदेश नेवगी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सामाजिक कार्याचा सन्मान आणि नव्या जबाबदारीची सुरुवात! सुदेश नेवगी यांच्या या नियुक्तीमुळे सावंतवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles