Accident – राजस्थानमध्ये धुळे येथील भाविकांवर काळाचा घाला! ; दर्शनाला गेलेल्या ९ जणांचा मृत्यू, वाहनांचा चक्काचूर!

कोटा : राजस्थानमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. राजस्थानच्या कोटामध्ये रविवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. कोटा-उदयपूर हायवेवर शंभूपुरा गावाजवळ भाविकांची कार उभ्या उसलेल्या ट्रकला धडकली. या क्रूझर व्हॅनमधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत 9 जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील धुळे येथील तीन कुटुंब स्वतंत्ररित्या वाहनाने खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन केल्यानंतर परतताना रविवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास कोटा-उदयपूर महामार्गावर शंभपुरा गावाजवळ घात झाला. अपघात इतका भीषण होता की, 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा थरार पाहून मदत करणारे लोक देखील घाबरून गेले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह ताब्यात घेत कोटा मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

धुळ्यातील या भाविकांच्या क्रूझर वाहनाने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला जोरदार धडक दिली. शंभूपुरा गावाजवळील नाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या भीषण अपघातात 9 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. सर्व भाविक हे धुळे जिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. या अपघातात मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. या अपघातानंतर धुळ्यातील या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी अपघाताविषयी महत्वाची माहिती दिली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी जोशी म्हणाले, शंभूपुराजवळ मध्यरात्री एकाच कुटुंबातील 16 जण वाहनाने दर्शनावरून परतत होते. त्यांचं वाहन हे ट्रकवर आदळले. हा अपघात दु:खद आणि वेदनादायी अपघात होता. यात ९ जण दगावले. सर्वजण खाटू श्यामजीच्या दर्शन करून महाराष्ट्रात परतत होते. सर्वजण एकाच कुटुंबातील होते. अपघातामधील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर 9 जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या भीषण अपघाताने धुळ्यातील या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles