सिंधुदुर्गनगरी : अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन, कुप्पम (आंध्रप्रदेश) व महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान व गणित शिक्षकांसाठी नुकतेच प्रशिक्षण पार पडले. सदर प्रशिक्षणामध्ये अगस्त्या फाऊंडेशन यांच्यामार्फत ज्ञानरचनावाद, कृतीयुक्त शिक्षण, विविध मॉडेल्स निर्मिती, तारांगण पाहणे, इको वॉक, योगा, आर्ट गॅलरी, टाकाऊ वस्तुतून विविध शैक्षणिक साहित्याची निर्मिती इत्यादी गोष्टी शिक्षकांना शिकण्यास मिळाल्या. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ विज्ञान व गणित विषयाचे शिक्षक सहभागी झालेले होते.
ADVT –
या प्रशिक्षणात आनंदा लक्ष्मण बामणीकर (दोडामार्ग इंग्लिश स्कूल, दोडामार्ग), प्रसाद गंगाराम गोसावी (नूतन माध्यमिक विद्यालय, कळणे), गणेश भिकाजी नाईक (कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा, मठ नं.१), सुनील परशराम करडे (जि. प. पू. प्राथ. शाळा, सांगेली सावरवाड), प्रतापसिंह अण्णासाहेब यादव (अध्यापक विद्यालय, कणकवली), मिलिंद महेश्वर लेले (केळकर हायस्कूल, वाडा), प्रसाद प्रभाकर चव्हाण (वर्धम हायस्कूल, पोईप), गौरव शंकर नाईक (जि. प. शाळा कुडाळ कवीलकाटे), प्रीती प्रवीण सावंत (राणी पार्वती हायस्कूल, सावंतवाडी), सिद्धी सुरेश भाईप (माध्यमिक विद्यालय, नाधवडे), स्नेहा विजय गावडे (विषय तज्ज्ञ – पंचायत समिती, सावंतवाडी) या शिक्षकांनी हे चार दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या सर्व शिक्षकांना सिंधुदुर्ग जिल्हा डाएटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, समन्वयक राजेंद्र जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
ADVT –