वेंगुर्ला : वेंगुर्ला आगारातील वाहतूक निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्या मनमानी कारभारामुळे वेळोवेळी आगार व्यवस्थापक यांच्या निदर्शनास आणून देखील त्या वर आगार व्यवस्थापक यांनी कोणतीही दखल न घेतल्याने सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या आगार कार्यकारणीने २६ जानेवारी २०२५ रोजी आगाराच्या गेटवर उपोषणास बसणार असल्याचे पत्र आगार व्यवस्थापक यांना दिनांक १३-०१-२०२५ रोजी देण्यांत आले, कर्मचाऱ्यांवर वेळोवेळी होणारा अन्याय, कर्मचाऱ्यांना देण्यांत येणारी उद्धट वर्तणूक, चुकीच्या पद्धतीने करण्यात येणारी प्रशासकीय कामे, चुकी नसतानाही कर्मचाऱ्यांना देण्यांत येणारी आरोप पत्रे , कर्मचाऱ्यांना धमकावणे, या मुळे कर्मचारी काम करण्याच्या मानसिकतेत नसून सदर वाहतूक निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांची तात्काळ आगारातून बदली करण्यात यावी या साठी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या सर्व पदाधिकारी यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.
या वेळी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे विभागीय सचिव भरत चव्हाण, विभागीय सहसचिव स्वप्निल रजपूत, आगार सचिव दाजी ततळवणेकर, आगार उपाध्यक्ष सखाराम सावळ, अनंत झोरे, महादेव भगत, ए. एम. नाईक अक्षय येसाजी, रामदास केदार अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ADVT –