Sunday, May 18, 2025

Buy now

spot_img

कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.!

सिंधुदुर्गनगरी :  कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2024 25 अंतर्गत कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या चार तालुक्यातील 35 शाळांना डिजिटल ई लर्निंग इक्विपमेंट (शैक्षणिक साहित्याचे) वाटप कुडाळ हायस्कूल कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास भाजपा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर, यशवर्धन राणे, सर्वेश पावस्कर (राष्ट्रवादी अ. प.) स्वरूप वाळके, रविराज नार्वेकर जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी अनिल मोहरे सर, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे सर, लतेश मामा नांदगावकर, खरात सर, ठाकरे सर, साळवी सर, आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.
आमदार श्री. म्हात्रे यांच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या आमदार फंडातून 1 कोटी 25 लाखाचे साहित्य ई लर्निंग चे सर्व शाळांना दिले, तसंच जिल्हा नियोजन फंडातून त्या वेळचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून 2 कोटीचे सोलर पॅनल व 2 कोटीचे संगणक मंजूर करून घेतले, लवकरच संगणकचे सुद्धा वाटप होईल.
दोन वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांसाठी 5 कोटी 25 लाखाचे शैक्षणिक साहित्य आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या प्रयत्न आणि सर्व शाळांना मिळाले, त्यामुळे सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक अतिशय खुश आहेत. खऱ्या अर्थाने आता आनंददाई शिक्षण देण्याचे काम आमदार म्हात्रे सरांच्या प्रयत्नाने होणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles