नागपुरात फिरंगी चितपट!, टीम इंडियाची पहिल्या वनडेत सरशी! ; रोहित-जयस्वाल फेल, श्रेयस, गिल अन् अक्षर हिट!

नागपूर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना नागपूरमध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. कारण इंग्लंडने 47.4 षटकं खेळत सर्व गडी बाद 248 धावा केल्या आणि 249 धावा जिंकायला दिल्या. भारताने हे आव्हान 38.4 षटकात 6 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं. या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळत झाली. या सामन्याचा निकाल काय लागेल त्यापेक्षा रोहित शर्माला सूर गवसतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं होतं. पण या सामन्यातही रोहित शर्मा फेल गेला. त्याला फक्त 2 धावा करता आल्या. तर यशस्वी जयस्वालही काही खास करू शकला नाही. त्यामुळे टीम इंडिया दडपणात आली होती. पण श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत डाव वेगाने पुढे नेला. एका बाजूने शुबमन गिल सावध खेळी करत होता. तर दुसऱ्या बाजूने श्रेयस अय्यर इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलाच धूत होता.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles