वडोदरा : वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी घोडदौड सुरु आहे. मागच्या पर्वात जेतेपद मिळवल्यानंतर विजयाची लय कायम ठेवली आहे. पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सला पराभूत केलं होतं. त्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सला 8 गडी राखून मात दिली आहे. यासह गुणतालिकेत आरसीबीने अव्वल स्थान पटकावलं आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला. कर्णधार स्मृती मंधानाने आतापर्यंत स्पर्धेत चालत आलेल्या ट्रेंड प्रमाणे प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कारण रात्री मैदानात दव पडलं की गोलंदाजी करणं कठीण जातं. त्याचा फायदा फलंदाजांना होतो. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात सर्व गडी गमवून 141 धावा केल्या आणि विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 16.2 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. स्मृती मंधानाने या सामन्यात चांगली खेळी केली. तिने 47 चेंडूत 10 चौकार आमइ 3 षटकारांच्या मदतीने 81 दावा केल्या. या विजयासह आरसीबीच्या खात्यात आणखी दोन गुण गेले आहेत. तसेच नेट रनरेटही चांगलाच वधारला आहे. या विजयानंतर स्मृती मंधानाने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
ADVT –
सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.