मुंबई : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याकरता भारतीय हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीच्या अरबी समुद्र किनार पट्टीच्या भागात सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत असून कोकण किनारपट्टी भागात कोणत्याही क्षण जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस आवकाळी पावसाचे ढग किनारपट्टी भागात असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कोकणात ढगाळ वातावरण असल्याने आणि अवकाळी पावसाची शक्यता असल्याने याचा फटका आंबा पिकाला होऊ शकतो. त्यामुळे बळीराजा या अवकाळी पावसाच्या इशाऱ्याने चिंतेत असल्याचे पाहायला मिळतंय. पुढचे दोन दिवस कोकण किनारपट्टी भागात ढगाळ हवामान असल्याचे पाहायला मिळणार आहे. यासह ताशी ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण असलं तर मात्र राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे.



