ठाणे : गेल्या सहा महिन्यांत डोंबिवली वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या तब्बल ५ हजार रिक्षाचालकांवर धडक कारवाई केली आहे. गणवेश न घालणे, परवाना नसणे, रिक्षावर नावफलक नसणे अशा विविध कारणांसाठी ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेषतः, रिक्षाचालकाच्या बाजूला ‘चौथी सीट’ बसवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांचे विशेष लक्ष आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास परवाना आणि रिक्षा परवाना रद्द करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांना दिला आहे. प्रवाशांनीही अशा जीवघेण्या आणि धोकादायक प्रवासापासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.