धुळे : तालुक्यातील नगावचे सुपुत्र, गंगामाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे प्राध्यापक डॉ. जी. एन. पाटील यांनी लेखन केलेल्या पाचव्या पुस्तकाचे आगमन झालं आहे. प्रस्तुत पुस्तक ‘प्राचीन भारताचा इतिहास’ (इ.स.पू.३००० ते इ. स. १२०६) हे NEP 2020 नुसार महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर वर्गासाठी उपयुक्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ इतिहास विषयाच्या एस. वाय. बी. ए. सत्र तीन व चार मेजर पेपर क्रमांक HIS-212,222 नवीन अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक तसेच एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठीही अत्यंत उपयुक्त असून प्रत्येक शाळेतील ग्रंथालयात समाविष्ट करावे, असे दर्जेदार व संग्रही पुस्तक आहे. आदरणीय प्रा. डॉ. गोकुळ पाटील यांचे आमदार रामदादा भदाणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे, सरपंच सौ. ज्ञानज्योती भदाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी अभिनांनाडण केले असून त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
प्रा. डॉ. जी. एन. पाटील लिखित ‘प्राचीन भारताचा इतिहास’ (इ.स.पू.३००० ते इ. स. १२०६) ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


