सावंतवाडी : काल घोषित झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे धक्कादायक निकालानंतर अनेक नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रीया दिल्या होत्या. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत एक खळबळजनक ट्विट एक्सवर केलंय.
आपल्या ट्विटमध्ये मंत्री श्री. राणे म्हणतात, ”

”गप्प होतो .. पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी.. पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात.. पण आता ती वेळ आली आहे !”
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व कट्टर राणे समर्थक समीर नलावडे यांना पराभव पत्कारावा लागला. हा पराभव जिव्हारी लागलेल्या मंत्री नितेश राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकीत आपल्या निदर्शनास आलेल्या काही गोष्टी पक्ष नेतृत्व व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज आपल्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करत मंत्री नितेश राणे यांनी आपली नाराजी उघड केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे कोणत्या गोष्टीचा ते खुलासा करणार?, कोणाची पोलखोल करणार?, याची उत्सुकता जनतेला लागली आहे.



