आपली प्रतिमा विधायक कार्यातून निर्माण होणे गरजेचे! : मानसी परब. ; ठाणे येथे मानसी परबांच्या कार्याचा झाला सन्मान.

ठाणे: ”ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजात स्वतःची प्रतिमा जपण्याचं प्रामाणिक काम करावं. तसेच आपल्या कार्याचा सुगंध सकारात्मक दृष्ट्या इतरत्र पोहोचवण्यासाठी स्वतःची चांगली इमेज तयार करावी. ही इमेज केवळ दिखाऊ नसावी तर विधायक कार्यातून होणे गरजेचे आहे. आज आपला झालेला सन्मान हा आपल्या कार्याची पोचपावती आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी अधिक वाढली असून कोणताही पुरस्कार हा केवळ पुरस्कार नसून तो अधिक कार्य करण्याची प्रेरणा असते”, असे मत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक कार्यकर्त्या मानसी परब – राणे यांनी ठाणे येथे व्यक्त केले.

इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा कौतुक सन्मान सोहळा मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या.

इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड ही संस्था शिक्षण, कला व संस्कृती , सामाजिक पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहे. समाजातील विविध घटकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, विचारप्रवर्तक उपक्रम राबवणे, तसेच गुणवंत व्यक्ती व कार्याचा योग्य सन्मान करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ही संस्था सामाजिक भान, बौद्धिक विकास, सांस्कृतिक जतन व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांद्वारे राष्ट्र उभारणीत सक्रिय योगदान देते. समाजात आपली ओळख निर्माण होण्यासाठी आपल्याकडून चांगलं कार्य घडणं अपेक्षित आहे तरच आपल्याला समाजात मान मिळतो, असेही कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सौ. मानसी परब – राणे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून विजय जाधव (उपनियंत्रक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समुह, ठाणे गृह विभाग विशेष, महाराष्ट्र शासन), ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भूपेंद्र संखे, समाजसेवक भारत खांडेकर, समाजसेवक प्रभाकर कांबळे, लक्ष्मीकांत पोपळे यांची लाभली. कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. बी. एन. खरात यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन सौ. स्नेहल येवला यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles