दोडामार्ग तालुक्यात विशाल परब यांचा झंझावाती दौरा! ; बुथनिहाय घेतला आढावा, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत विशाल परब मैदानात सक्रिय.

दोडामार्ग : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या मतदानादरम्यान भाजपा युवानेते विशाल परब यांनी तालुक्यात झंझावाती दौरा केला. माटणे, आयी, वझरे, भेडशी आदी गावांतील विविध मतदान केंद्रांवर त्यांनी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.


या दौऱ्यात त्यांच्यासमवेत दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, शिरीष नाईक, प्रितम पोकळे, पंचायत समिती उमेदवार पार्वती गवस, बबलू पांगम, शानी बोर्डेकर, माजी सरपंच महादेव गवस आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles